पुणे : आई वडिलांच्या मृत्युनंतर एका अल्पवयीन मुलीची एका महिलेशी ओळख झाली. तिने या मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यास सुरुवात केली. त्यातून ती गर्भवती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
माया महादेव ऊर्फ आरती काळे, तृतीयपंथी महादेव ऊर्फ भारती काळे (दोघे रा.कलवड जकात नाक्याजवळ, धानोरी), इतर ३ अज्ञात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुलीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला असून ती लोहगाव येथील एका महिलेकडे रहायला आहे. तिची माया व महादेव काळे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी या अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यास सुरुवात केली. ओळखीच्या ग्राहकांकडून पैसे घेऊन तिला वेश्यागमनासाठी खराडी येथील सूर्या लॉज येथे पाठवत असत. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिने तिने ९ जानेवारी रोजी ससून रुगणालयात एका मुलाला जन्म दिला.त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी महिला दक्षता समितीच्या महिला सदस्यांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: An orphaned minor girl from a prostitution business gave birth to a boy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.