पुणे : पुणे रेल्वे स्थानकाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सूरज शुक्लाबाबत पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. हा मूळचा वाराणसीचा असून गेल्या तीन महिन्यापासून तो अशी कृत्य करत असल्याने त्यांनी सांगितले आहे. सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन रात्री पुतळ्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. हा माथेफिरू आहे कि नाही? याबाबतही तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सूरज शुक्लावर या घटनेनंतर गुन्हा दाखल केला आहे. तो मूळचा वाराणसीचा आहे. ३ महिन्यापासून तो अशी कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे रेल्वे स्थाकावरून घेतलेली ८ ते १० पुस्तके आहेत. तो वाईला देवदर्शनाला गेला होता. तिथून त्याने कोयता विकत घेतला. त्यानंतर पुतळ्याची विटंबना केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तो मनोरुग्ण आहे कि नाही याबाबतही तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन पुतळ्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. स्टेशनजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यामोर काँगेसने आंदोलन केले आहे. तसेच पुतळ्याला दुग्धाभिषेकही करण्यात आला आहे. पोलिसांकडून याबाबत सखोल तपास सुरु आहे. काँगेसनेही या घटनेची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलन केले.