विरोधकांना जनता जागा दाखवेल : वळसे पाटील
By Admin | Updated: September 26, 2014 05:43 IST2014-09-26T05:43:23+5:302014-09-26T05:43:23+5:30
सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुखाचे दिवस यावे यासाठी माझा सदैव प्रयत्न राहिला आहे.

विरोधकांना जनता जागा दाखवेल : वळसे पाटील
मंचर : सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुखाचे दिवस यावे यासाठी माझा सदैव प्रयत्न राहिला आहे. आंबेगाव तालुक्यात विरोधक भूलथापांचे राजकारण करत असून खोटे बोलण्याचे, निंदानालस्ती करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत जनता विरोधकांना त्यांची जागा दाखवतील, असे मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
मंचर येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात वळसे पाटील बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. आंबेगावात तालुक्यात विकासकामे झाली नसल्याचा विरोधकांच्या आरोपाचा वळसे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की ज्याला कावीळ होते, त्यांना सर्वत्र पिवळे दिसू लागते. विरोधकांची तीच गत झाली आहे. ’’ (वार्ताहर)