शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोड व पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

अलंकापुरीत प्रस्तावित असलेल्या रिंगरोड प्रकल्पाला स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला असून, काळ्या फिती लावून बाधितांनी रिंगरोडच्या आखणीस व मोजणीस ...

अलंकापुरीत प्रस्तावित असलेल्या रिंगरोड प्रकल्पाला स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला असून, काळ्या फिती लावून बाधितांनी रिंगरोडच्या आखणीस व मोजणीस विरोध दर्शविला आहे. तर मरकळ, चऱ्होली खुर्द गावातील बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे प्रकल्प आमच्या जमिनीतून होऊ देणार नसल्याची भूमिका मांडली आहे.

तीर्थक्षेत्र आळंदीत गुरुवारी (दि. १७) प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण व संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिंग रोड बाधितांची संवाद बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी या प्रस्तावित रिंगरोडला विरोध करत पर्यायी मार्ग अवलंब करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांना काळविण्याची ग्वाही दिल्यानंतर बाधित शेतकरी शांत झाले.

दरम्यान रिंगरोड प्रकल्पाने अनेकजण भूमिहीन होणार आहेत. शेती, घरे उद्ध्वस्त होणार असल्याने अनेकांना जीवन जगणेही मुश्कील होणार आहे. त्यामुळे आमचे जीवन उद्ध्वस्त करून कोणाचे ड्रीम प्रोजेक्ट उभे राहणार नाहीत. विकासाला विरोध नाही. मात्र, रिंगरोड व पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे आमच्या जमिनी शिल्लक राहणार नाहीत. अशा या ड्रीम प्रोजेक्टला नेहमी आमचा विरोधच राहणार आहे. प्रस्तावित रिंगरोडची आखणी बदलून ती शासकीय गायरान व वन विभागाच्या जमिनीतून विकसित करण्याची मागणी संवाद बैठकीत करण्यात आली.

--

फोटो क्रमांक : १७आळंदी पुणे-नाशिक विरोध

फोटो ओळ : चऱ्होली खुर्द !! (ता. खेड) येथे प्रशासनाला लेखी निवेदन देताना बाधित शेतकरी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)