शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

पुणेकर चालकांची हेल्मेट वापराकडे पाठ अन् सक्तीलाही विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 3:16 AM

पुणे : शहरात पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरात विविध रस्त्यांवरील प्रमुख चौकांमध्ये पाहणी ...

पुणे : शहरात पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरात विविध रस्त्यांवरील प्रमुख चौकांमध्ये पाहणी केली. या पाहणीमध्ये केवळ १५ ते २० टक्के दुचाकीचालक हेल्मेट घालत असल्याचे दिसून आले. हेल्मेट न घातलेल्या अनेकांनी सक्तीच्या निर्णयावर विरोधी मत नोंदविले.

वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही हेल्मेटसक्तीचा प्रयत्न केला होता. पण त्याला तितकाच जोरदार विरोध झाला. कायद्याप्रमाणे हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्याचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची, तर कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. शहरातील अनेक वाहनचालक हेल्मेटचा वापर करतात. पण त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक वाहनचालकांचा याला विरोध आहे. लोकमत प्रतिनिधींनी स्वारगेट येथे जेधे चौक, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक, दांडेकर पूल चौक, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला आॅफिस चौक, जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये काही वेळ थांबून पाहणी केली. या वेळेमध्ये आलेल्या दुचाकीचालकांचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये हेल्मेटधारक चालकांची संख्या अगदी तुरळक असल्याचे दिसून आले. त्यामुळे सिग्नलला थांबलेल्या गर्दीत हे चालक ठळकपणे जाणवत होते. एका सिग्नलवर थांबलेल्या ३० ते ४० दुचाकींपैकी केवळ ५ ते ७ हेल्मेटधारक चालक होते. त्यामध्ये तरुणांची संख्या अधिक होती. काही ज्येष्ठ नागरिकही आढळून आले. महिलांचे प्रमाण अगदी नगण्य होते.५०० रुपये दंड मोजावा लागणार...हेल्मेटसक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संबंधित वाहनचालकांकडून त्या-त्या नियमभंंगाचा दंड वसूल केला जात होता.आता सिग्नल जंपिंग, नो एन्ट्री, राँग वे, विनापरवाना वाहन चालविणे असे नियमभंग करणाºयांना हेल्मेट नसल्याबद्दल देखील दंड भरावा लागणार आहे.४सध्या शहरात विनाहेल्मेट वाहन चालविणाºयांना ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे.४विनापरवाना वाहन चालविणाºयांना ५००, नो एंट्री २००, रॉँग साईड २००, फॅन्सी नंबर १००० आणि नो पार्किंगसाठी २०० रुपयांचा दंड आकरण्यात येतो. दुचाकीवरून प्रवास करणाºया दोन्ही व्यक्तींकडे हेल्मेट नसेल तर १ हजार रुपये दंड आहे.हेल्मेटसक्ती नको...मी दररोज हेल्मेट वापरतो. परंतु हेल्मेट हायवेला वापरणे आवश्यक आहे. शहरात वाहतूक प्रचंड असल्यामुळे हेल्मेट वापरणे अवघड जाते.- चंदन भागनेहेल्मेटसक्ती शहरामध्ये नको. त्याची महामार्गावरील दुचाकीस्वारासाठी जास्त गरज आहे. शहरामध्ये हेल्मेट वापरायचे की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे.- शेखर कळसकरहेल्मेटची सक्ती करता कामा नये. ज्याचे त्याला कळले पाहिजे की हे आपल्याच सुरक्षेसाठी आहे पण पुणेकरांना पहिल्यापासूनच हेल्मेटची सवय नाही. हेल्मेटमुळे काही वेळा हॉर्न ऐकू येत नाही त्यामुळे अगोदर लोकांना हॉर्न न वाजवता गाडी चालवण्याची सवय लागली पाहिजे. काही लोकांना हॉर्न वाजवण्याचा आजार असतो.- विनोद कांबळे

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरCrime Newsगुन्हेगारी