शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

आंबेगाव तालुक्यात मध्यवर्ती शाळा संकल्पनेला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 1:43 AM

तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे.

डिंभे : तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून दीपावली सुटीनंतर पहिल्याच दिवशी या केंद्रातील सात शाळा तिरपाड येथे भरविण्यासाठीच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरू झाल्या आहेत. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या या निर्णयास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध होत आहे. निर्णय मागे न घेतल्यास आंबेगाव तालुका पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा बंद होणाऱ्या शाळांतील गावकºयांनी निवेदनाद्वारे दिला आहे. गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तसेच जिल्हाधिकाºयांनाहीया निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील तिरपाड या केंद्रातील दुर्गम ठिकाणी असलेल्या ढकेवाडी, फणसवाडी, नानवडे, न्हावेड, कापरवाडी, सडकेचीवाडी व पिंपरगणे या सात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून त्या तिरपाड येथे ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबवून एकत्रित भरविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेमार्फत नुकताच घेण्यात आला आहे. २३ आॅक्टोबर २०१८ च्या गटविकास अधिकारी पं. स. आंबेगाव यांच्याकडील पत्राचा संदर्भ घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थी समायोजनासाठी या सात शाळांधील विद्यार्थीसंख्या, त्यांच्या बैठकव्यवस्थेसाठी वर्गखोल्या पुरेशा व सुस्थितीत आहेत का? याची पाहणी करणे, ज्या शाळांचे समायोजन करावयाचे आहे, त्या शाळांतील शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची संमती घेणे, अभिलेखाचे एकत्रिकरण करणे, विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्यासाठी अग्रक्रमाने वाहतूकव्यवस्था करणे व एकत्रिकरणामुळे अतिरिक्त होणाºया शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी नियोजन करणे अशी कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुटीपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करून सुटीनंतरच्या पहिल्या दिवसापासून मध्यवर्ती शाळा सुरू करण्याचे धोरण आहे.पुणे जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या या निर्णयाला मात्र संबंधित गावकºयांनी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आमची लहान लहान मुले असल्याने गाव सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय आम्हाला मान्य नाही. शाळांचा परिसर अवघड डोंगरउताराचा असून मुलांची ने-आण करण्यासाठी बस वाडी-वस्तीवर पोहोचणार नाहीत. काही मुलांची घरे शेतात आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार कोणत्याही वाडी-वस्तीपासून १ किमीच्या अंतरावर प्राथमिक शाळा व ३ किमीच्या अंतरावर उच्च प्राथमिक शाळा असण्याचे धोरण असताना आदिवासी मुलांचे शिक्षणच हिरावून घेणारा हा निर्णय कशासाठी? पेसा कायद्याअंतर्गत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार प्रथमत: ग्रामसभेला असताना या निर्णयासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याच्या भावना आहेत.सर्वशिक्षा मोहिमेअंतर्गत २० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात यावे, असे धोरण आहे. आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, विद्यार्थीसंख्येनुसार वर्गनिहाय व विषयनिहाय शिक्षक उपलब्ध करून देता यावेत, शालेय पोषण आहारात सुधारणा करता यावी, यासाठी तिरपाड केंद्रातील शाळांचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला आहे. - पोपटराव महाजन, गटशिक्षणाधिकारी, पं. स. आंबेगावतिरपाड केंद्रातील सात शाळांचे समायोजन करून मध्यवर्ती शाळा ही संकल्पना राबविण्यासाठी जि. प. निर्णय आहे. यावर ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या भावनानुसार प्राप्त निवेदने पुणे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. - राहुल काळभोर (गटविकास अधिकारी पं. स. आंबेगाव)

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र