शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पीएमपी पास दरवाढीविरोधात सह्यांची मोहीम सुरूच राहणार; आंदोलनाद्वारेही करणार निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 3:06 PM

पीएमपी प्रवासी मंच व पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील ११ संस्थांनी पीएमपीएमएल बस पास दरवाढ व ‘पंचिंग’ (एक मार्ग) पास रद्द करण्याबाबत हाती घेतलेली सह्यांची मोहीम आणखी काही दिवस सुरू ठेवली जाणार आहे.

ठळक मुद्देसुमारे १५ हजार नारिकांनी सह्या करून दरवाढीला केला विरोध दरवाढीविरोधातील लढा न थांबवता लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करून केला जाणार तीव्र

पुणे : पीएमपी प्रवासी मंच व पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील ११ संस्थांनी पीएमपीएमएल बस पास दरवाढ व ‘पंचिंग’ (एक मार्ग) पास रद्द करण्याबाबत हाती घेतलेली सह्यांची मोहीम आणखी काही दिवस सुरू ठेवली जाणार आहे. त्याचप्रमाणे या पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून दरवाढीचा निषेध केला जाणार आहे.गेल्या महिन्याभरापासून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील संस्थांनी पीएमपी बस दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहिम सुरू केली. त्यात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. सुमारे १५ हजार नारिकांनी सह्या करून दरवाढीला विरोध केला. त्यानंतर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दरवाढी संदर्भातील प्रवाश्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी प्रवासी मंच व सजग नागरिक मंचातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. परंतु, त्यामुळे दरवाढीविरोधातील लढा न थांबवता लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करून तो तीव्र केला जाणार आहे.सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, की जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पीएमपी दरवाढीबाबत भूमिका घेतली नाही. त्यांनी यात लक्ष दिले असते तर दरवाढ झाली नसती. त्यामुळे या पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. तसेच पुढील आंदोलनबाबत येत्या मंगळवारी (दि. ५) होणाऱ्या प्रवासी मंचाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड