शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:08 IST

विरोधकांनी येण्याचे टाळलं, त्यांनी पळ काढला यातून त्यांची दुटप्पी भूमिका दिसते

बारामती : दहा टक्के मराठा आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे दिले. ओबीसी समाजाचे कुठल्याही समाजाचं कमी न करता दिले. आता हे प्रकरण न्यायालयात आहे. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी जस्टिस शिंदे कमिटी (Shinde Committee) काम करत आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आक्षेप आलेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीतदेखील अनेक मुद्दे त्यामध्ये आले. यावरदेखील सरकार काम करत आहे. मराठा आणि ओबीसींसाठी अतिशय संवेदनशील महत्त्वाची बैठक असताना त्यामध्ये विरोधकांनी येण्याचे टाळलं, त्यांनी पळ काढला. त्यांची दुटप्पी भूमिका त्यातून दिसते. या दोन्ही मुद्द्यांवर सरकार संवेदनशील आहे. सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे, अशी भूमिका मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मांडली.

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी व पाहणी दौऱ्याकरिता मुख्यमंत्री शिंदे यांचे बारामती विमानतळ येथून वाहनाने पंढरपूरकडे प्रयाण झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आषाढी वारी आहे. सोयी सुविधा रस्ते या सर्वांचा एक आढावा घेण्यासाठी पंढरपूरला जात आहे. राज्यातदेखील दोन अडीच वर्षांत अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ते झाले. जे दोन वर्षांत आम्ही काम केले, त्याची तुला अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या बरोबर केली. त्यांनी जे काही स्पीड ब्रेकर घातले होते ,ते सर्व स्पीड ब्रेकर आम्ही काढले. त्या उद्योगांना चालना दिली. कल्याणकारी योजना लॉन्च केल्या. आणखी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या राज्यात महायुतीचे सरकार आणू, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत 

बारामती विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. त्यांच्या समवेत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे होते. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण