Operation Sindoor : पुणे महापालिकेत मॉक ड्रील यशस्वी
By राजू हिंगे | Updated: May 7, 2025 20:07 IST2025-05-07T20:04:47+5:302025-05-07T20:07:21+5:30
आपत्ती परिस्थितीत कशी काळजी घ्यावी, सर्व यंत्रण यांना कसे सहकार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले

Operation Sindoor : पुणे महापालिकेत मॉक ड्रील यशस्वी
पुणे :पुणे महापालिकेच्या मुख्य इमारत येथे युद्धजन्य परिस्थितीत काय करायचे याचे मॉक ड्रील (रंगीत तालीम) घेण्यात आले. यामध्ये नागरी सरंक्षण दल, अग्निशमन दल, वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभाग, मनपा सुरक्षा विभाग, आपत्ती व्यस्थापन विभाग यांनी योग्य समन्वय साधून मॉक ड्रील यशस्वी केली.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मॉक ड्रील (रंगीत तालीम) बाबत सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना सविस्तर माहिती दिली.
आपत्ती परिस्थितीत कशी काळजी घ्यावी, सर्व यंत्रण यांना कसे सहकार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख, गणेश सोनुने, सुरक्षा अधिकारी राकेश विटकर , एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी , नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.