बोलायचं नसतं डायरेक्ट अॅक्शन घ्यायची असते; भारत- पाक युध्दावर शरद पवारांचे सुचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:57 IST2025-05-10T16:55:12+5:302025-05-10T16:57:46+5:30
शरद पवार यांंनी भारत पाक युध्दावर सुचक वक्तव्य करीत भारताने केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले आहे.

बोलायचं नसतं डायरेक्ट अॅक्शन घ्यायची असते; भारत- पाक युध्दावर शरद पवारांचे सुचक वक्तव्य
बारामती - भारत पाकिस्तानमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय लष्कराने रणनीती आखली आहे. २७ निष्पाप भारतीय पर्यटकांना दहशतवादांनी मारल्यानंतर भारताने चांगलाच बदला घेतल्याची भावना भारतीय नागरीकांमध्ये आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी,'बोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची' असते,अशा मोजक्या शब्दात सुचक वक्तव्य केले आहे. शरद पवार हे त्यांच्या माळेगांव येथील गोविंदबाग निवासस्थानी ( दि ९ ) मुक्कामी दौऱ्यावर होते. आज शनिवारी(दि १०) पवार बाहेरगावी दौऱ्यावर निघाले होते.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पवार यांंनी भारत पाक युध्दावर सुचक वक्तव्य करीत भारताने केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी बारामती येथील निवासस्थानी शिक्षण विकास मंच कार्यकर्त्यांनी, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सहकाऱ्यांशी शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या आमूलाग्र बदलांविषयी रचनात्मक चर्चा केली.या चर्चेत डॉ. वसंत काळपांडे, भाऊ गावंडे, बसंती रॉय, दत्ता बाळसराफ, डॉ. माधव सूर्यवंशी, योगेश कुदळे व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.तसेच काही नागरीकांनी देखील पवार यांची भेट घेतली.