शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांच्या आरोप, मोर्चे, आंदोलनांसारख्या जोरदार हल्ल्यांवर पालकमंत्र्यांचे फक्त मौन : शहर भाजपाची होतेय कुचंबणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:58 IST

हेल्मेट सक्ती असो, पाणी असो, वाहतूकीची समस्या असो कशावरच बापट काहीच बोलायला तयार नाही. 

ठळक मुद्देसर्वपक्षीय रोष : पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याची कुजबूज 

पुणे: वेगवेगळ्या समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेससह शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष पालकमंत्री गिरीश बापट यांना पेचात पकडत आहेत. आरोप, मोर्चे, निदर्शने, राजीनाम्याची मागणी होत आहे. तरीही बापट काहीच प्रत्युत्तर करत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेची राजकीय कुचंबणा होत आहे. पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याची कुजबूज पक्षात सुरू झाली आहे. शहराचा खासदार, आठ आमदार, पक्षाचे १०३ नगरसेवक व महापालिकेत स्पष्ट बहुमत, राज्यात सत्ता, केंद्रातही सत्ता असे असल्यामुळे शहरात भाजपाचे राजकीय वर्चस्व आहे. पालकमंत्री म्हणून बापटच पक्षाचे शहरातील प्रमुख आहेत, मात्र गेले काही वर्षभर सातत्याने ते वादविषय होत आहेत. हिरव्या देठापासून जी सुरूवात झाली ती थांबायलाच तयार नाही. अगदी अलीकडे तर शहराच्या पाण्याच्या विषयावरून ते वादात सापडले आहेत. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री असूनही जलसंपदाने त्यांच्या शहराचे पाणी तीन वेळा तोडण्याचा प्रताप केला. पुण्याचे पाण्यावर संक्रात आणण्याचा पणच केल्यासारखे जलसंपदाचे अधिकारी वागत आहेत.त्यामुळे जलसंपदाच्या विरोधात भाजपाचेच खासदार अनिल शिरोळे यांनी महापालिका भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता तर महापौर मुक्ता टिळक तसेच महापालिकेतील भाजपाच्या अन्य पदाधिकाºयांनीही जलसंपदावर तीव्र शब्दात टीका केली. महापौरांनी तर जलसंपदाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तरीही बापट यांनी मात्र यावर काहीच भुमिका घेतली नाही. फारच टीका होऊ लागल्यावर त्यांनी एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली, मात्र त्यातही त्यांनी गोलमटोल भुमिका घेत शेवटी काहीच निर्णय घेतला नाही. हेल्मेट सक्ती असो, पाणी असो, वाहतूकीची समस्या असो कशावरच बापट काहीच बोलायला तयार नाही. त्यातच रेशनिंग प्रकरण जाहीर झाले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंबधीच्या निकालात बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला असे स्पष्ट शब्दात खडसावले आहे. तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोषी ठरवेलेल्या रेशनिंग दुकानदाराला त्याचा परवाना परत करण्याचे हे प्रकरण आहे व त्यात बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला असे दिसते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे व आम आदमी पार्टी या सर्वच राजकीय पक्षांनी बापट यांच्या विरोधात वेगवेगळे मोर्चे काढले, निदर्शने केली, धरणे धरले व बापट यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनात अनेक आरोप, टीका करण्यात आली. पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली तर पक्षाच्या शहर शाखचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी लगेचच काकडे यांचा निषेध केला. दानवे यांच्या मदतीला धावली तशी शहर शाखा बापट यांच्या मदतीला मात्र धावायला तयार नाही. ते काही बोलत नाही तर आम्ही कसे मध्येच बोलणार असे शहर शाखेतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाण्याच्या समस्येला आम्हाला तोंड द्यावे लागते आहे हे माहिती असूनही ते जलसंपदा मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना काही सांगत नसतील तर त्यांना साह्य कसे करावे असा प्रश्न महापालिकेतील पदाधिकारीही विचारतात.बापट यांचे हे मौन आता भाजपाच्याच कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे. त्यांनी सर्व आरोपांना खडसून उत्तर दिले पाहिजे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यावरील आरोपांना तेच प्रत्युत्तर देऊ शकतात, अन्य पदाधिकारी कसे देतील असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यांच्यातीलच काहींनी पक्षाच्या प्रतिमेवर बापट यांच्या या मौनाचा अनिष्ट परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले. इतके मोठे राजकीय वर्चस्व असतानाही केवळ बापट यांच्यामुळे पक्षाला बॅकफूटवर जाणे भाग पडते आहे असे या दुसºया फळीतील कार्यकर्त्यांनी सांगितले. ---------------------  खुलासा घेतला मागेरेशनिंग प्रकरणावर बापट यांच्या कार्यालयाने एक खुलासा माध्यमांना पाठवला होता, मात्र तो लगेचच मागे घेण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, खुलासा प्रसिद्ध करू नये असे माध्यम प्रतिनिधींना कळवण्यात आले. त्यामुळे बापट यांचे मौन अधिकच प्रसिद्ध झाले आहे. ...................राजकारणाचाच भागशांत बसणे हा बापट यांच्या राजकारणाचाच भाग असल्याचीही चर्चा आहे. प्रत्यूत्तर देत बसले तर विषय वाढतो, न दिले तर लोक ते विसरून जातात याविचाराने बापट यांनी सर्व आरोपांवर चुप्पी बाळगली असल्याचे त्यांच्या निकटच्या समर्थकांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस