शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उजनी धरणात केवळ २२.९० टक्के पाणीसाठा : भीमा खो-यातील धरणांची पातळी खालवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 21:35 IST

सर्वात मोठा पसारा असणारे उजनी धरण यंदा १०० टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धरणात बराच पाणीसाठा शिल्लक राहिल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

पुणे : सर्वात मोठा पसारा असणारे उजनी धरण यंदा १०० टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धरणात बराच पाणीसाठा शिल्लक राहिल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळेल असा अंदाज होता. मात्र,गेल्या चार ते पाच महिन्यात उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाल्यामुळे धरणात सध्या केवळ २२.९० टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक  आहे. 

             फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यातच भीमा खो-यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक झाली आहे.आत्तापासूनच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर उन्हळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.भीमा खो-यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 50 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातही पुणे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा चांगलाच खालवल्याचे दिसून येत आहे.                  यंदा मान्सूनचे आगमन लांबले.तसेच सप्टेबर महिन्यापर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पुणे जिल्ह्यासह भीमा खो-यातील अनेक धरणे शंभर टक्क्यांपर्यंत भरली. त्यामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, सप्टेबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत पाणीसाठा चांगलाच खालवला. सध्या थंडीचा कालावधी असल्याने धरणामधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्याप्रमाणात होत नाही. परंतु, पुढील चार ते पाच महिन्यात बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी धरणाची पाणीपातळी चांगलीच खालवणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी पुरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भीमा खो-यातील धरणामधील पाणीसाठ्याची टक्केवारी पुढील प्रमाणे :-  कळमोडी  २४.०२,चासकमान  ३८.०६ ,भामा आसखेड ५९.७६ , वडीवळे  ६६.८०, आंद्रा  ८१.४४, पवना ५४.१४ ,कासारसाई ५५.६० ,मुळशी ५२.३३ , टेमघर ०.८६,वरसगाव ५२.४९ ,पानशेत  ५०.२५, खडकवासला ५६.२२, गुंजवणी  ३८.८६, निरा देवधर  ३८.२५, भाटघर ५०.८०,वीर ६३.६१,नाझरे ०.०,उजनी  २२.९० पिंपळगाव जोगे  २५.६५ , माणिकडोह  १२.४९,येडगाव  २९.३८,वडज २५.७६ ,डिंभे ३९.१०,घोड १२.९९, विसापूर ५.०८,

टॅग्स :Ujine Damउजनी धरणdroughtदुष्काळWaterपाणी