शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 21:04 IST

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे

आसखेड (खेड तालुका) : चार तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी महत्त्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन १० एप्रिल २०२५ रोजी सुरू करण्यात आले. त्यासाठी १ हजार २०० क्युसेक प्रति सेकंद वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.

उन्हाळी व पाहिले आवर्तन ३ मार्च २०२५ ते १३ मार्च २०२५ दरम्यान सोडण्यात आले होते. त्यावेळी आलेगावपागापर्यंत सुमारे १८ बंधारे भरले होते, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरे आवर्तन तब्बल ३३ दिवस १२०० क्युसेकने सोडण्यात आले होत. या पाण्यामुळे खेड तालुक्यातील १०, शिरूरमधील ४, हवेलीमधील ४ तर दौंडमधील ६ बंधारे (एकूण २४ बंधारे) भरण्यात आले. परंतु, त्यानंतर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टक्के पाणीसाठा कमी राहिला. परंतु, गेले दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने कित्येक बंधाऱ्यांतील पाणी किमान ७ ते ८ दिवस वापरले जाणार नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत पावसाने दडी मारली तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा अंदाज धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी व्यक्त केला आहे.

यंदा एकूण १२९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भामा आसखेड हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे आहे. उपयुक्त साठा ३२.७६६ दलघमी (१.१६ टीएमसी) आहे. धरणात एकूण पाणीसाठा ४२.२८८ दलघमी (१.६३ टीएमसी) इतका असून, धरणसाठा १५.०९ टक्के आहे तर गतवर्षी २०.१५ टक्के इतका होता.भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे. या ३३ दिवस सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे २४ बंधारे भरले. त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असूनही सुमारे महिनाभर पिण्याच्या पाणी योजनेला अडचण येणार नाही.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीKhedखेडRainपाऊसFarmerशेतकरी