शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

खडकवासला धरण प्रकल्पात फक्त १४.३३टीएमसी पाणीसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 17:59 IST

वाढलेली लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करता काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे.

ठळक मुद्देतीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा 

पुणे: खडकवासला धरण प्रकल्पात सध्या केवळ १४.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र,उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय झाल्याचे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांपासून अधिका-यांपर्यंत सर्वच बोलत असल्याने पुणेकरांच्या डोक्यावरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाली आहे. परंतु, वाढलेली लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करता काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे.सध्या धरणात मागील तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. पुणे महापालिका व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने दिला आहे. मात्र,धरणातील पाणीसाठा कमी असल्याने आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निश्चित झाल्याने यंदा उन्हाळी आवर्तन सोडले जाणार नसल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. पुणे महापालिकेकडून १३५० एमएलडी पाणी वापरले जात असून पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही,असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. परंतु,गेल्या तीन वर्षाचा  विचार करता यंदा धरणात सर्वात कमी १४.३३ पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २ फेब्रुवारी २०१८ रोजी धरण प्रकल्पात १९.१८ टीएमसी तर २ फेब्रुवारी २०१७ रोजी धरणांत १८.२० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या दोन वर्षात पुण्याच्या लोख संख्येत चांगलीच भर पडली आहे.जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुण्याचे पाणी १३५० एमएलडी पेक्षा कमी केले जाणार नसल्याच्या असा निर्णय झाला असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्यातून शेतीसाठी सोडले जाणारे आवर्तन रद्द करावे लागणार आहे.परंतु,ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्यासाठी मागणी करण्यात आली तर शेतीसाठी नाही. परंतु, पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे.त्यामुळे पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे.--------गेल्या सहा वर्षाचा ३ फेब्रुवारी रोजीचा खडकवासला धरणप्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसी)वर्ष         पाणीसाठा २०१९        १४.३३२०१८        १९.१८२०१७        १८.२०२०१६        १०.७७२०१५        १६.९५

 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका