पीएमपीच्या बँक खात्यात शिल्लक फक्त १० हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:24 PM2019-11-08T12:24:40+5:302019-11-08T12:30:49+5:30

दोन दिवसांपुर्वी पीएमपी) च्या खात्यात फक्त दहा हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे...

only 10, 000 rupees Balance in PMP's bank account | पीएमपीच्या बँक खात्यात शिल्लक फक्त १० हजार रुपये

पीएमपीच्या बँक खात्यात शिल्लक फक्त १० हजार रुपये

Next
ठळक मुद्दे पीएमपी आर्थिक स्थिती बिकट  दरवर्षी पीएमपीचा तोटा म्हणजेच संचलन तुट काही कोटी रुपयांनी वाढतच चालला‘पीएमपी’ला प्रवासी उत्पन्नासह जाहीरात, इमारत भाडे, ठेकेदारांना दंड आदी मार्गाने उत्पन्न

- राजानंद मोरे
पुणे : दैनंदिन सव्वा ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या बँक खात्यात कोट्यावधी रुपयांची शिल्लक असावी, असा तुमचा समज नक्कीच असेल. काहीवेळा ही शिल्लक असतेही. पण दोन दिवसांपुर्वी या खात्यात फक्त दहा हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. दैनंदिन उत्पन्न खात्यात जमा झाल्यानंतर त्यात वाढ होत जाईल. पण दहा तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करायचे, हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. 
दरवर्षी पीएमपीचा तोटा म्हणजेच संचलन तुट काही कोटी रुपयांनी वाढतच चालला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुमारे २०४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामध्ये २०१८-१९ मध्ये तब्बल ४४ कोटी रुपयांची भर पडून हा तोटा २४४ कोटी रुपयांपर्यंत पोहचला. यंदाही त्यामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ‘पीएमपी’ कर्मचारी व अधिकाºयांचे वेतन दि. १ व १० असे दोन टप्प्यात होते. आॅक्टोबर महिन्याचे पहिल्या टप्प्यातील वेतन दि. १ ऐवजी ४ तारखेला देण्यात आले. वेतनासाठी पुरेसा निधी नसल्याने विलंब झाल्याचे सांगण्यात आले. या वेतनानंतर पीएमपीच्या खात्यात केवळ १० हजार रुपये रक्कम शिल्लक राहिली. पुढील पाच-सहा दिवसांतच दुसºया टप्प्यातील वेतन करायचे असल्याने हा आकडा ‘पीएमपी’ अधिकाºयांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. याची कबुली एका अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
पीएमपीच्या खात्यात दैनंदिन प्रवासी उत्पन्नाची रक्कम जमा होते. महिनाभर जमा झालेल्या रकमेतून कर्मचाºयांचे वेतन दिले जाते. पण प्रत्यक्षात जमा रक्कम व खर्चाचा ताळमेळ बसविताना आता मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरूवातीला पहिल्या टप्प्यातील वेतनानंतरच केवळ १० हजार रुपये खात्यात शिल्लक राहिल्याची स्थिती उदभवली आहे. आता पुढील वेतनासाठी काही दिवसांच्या तिकीट व पास विक्रीतून मिळणाºया उत्पन्नाची वाट पाहावी लागणार आहे. तसेच दोन्ही महापालिकांकडून संचलन तुटच्या नावाखाली पैसे घ्यावे लागण्याची शक्यता आहे. 
-----------
नवीन बसगाड्या वाढल्या मुळे प्रवासी संख्येत वाढ होत आहे. दिवाळीनंतर तिकीट विक्रीतील उत्पन्नात चांगली वाढ दिसून आली आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडूनही पावले उचलली जात आहेत. 
- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
-------------
................
तिकीट व पास विक्री - सुमारे ६५ ते ७० टक्के
जाहिरात - सुमारे १ टक्के
दंड - सुमारे ३ ते ५ टक्के
संचलन तुट - सुमारे २५ ते ३० टक्के
------------
असा होतो खर्च
वेतन व इतर प्रशासकीय - ५० ते ५२ टक्के
इंधन - १३ ते १५ टक्के
बस भाडे - २० ते २५ टक्के
देखभाल-दुरूस्ती - ५ ते ६ टक्के
इतर - ३ ते ५ टक्के
........
आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील स्थिती -
एकूण उत्पन्न - ६२१.२५ कोटी रुपये
एकूण खर्च - ८६५.८० कोटी रुपये
एकूण संचलन तूट - २४४.५५ कोटी रुपये
-----------

* असे मिळते उत्पन्न
‘पीएमपी’ला प्रवासी उत्पन्नासह जाहीरात, इमारत भाडे, ठेकेदारांना दंड आदी मार्गाने उत्पन्न मिळते. यापैकी सुमारे ५० टक्के खर्च कर्मचारी वेतन व इतर प्रशासकीय कारणांसाठी होतो. सुमारे १३ ते १४ टक्के खर्च इंधन, सुमारे २५ टक्के खर्च बस भाडे, ४ ते ५ टक्के खर्च देखभाल-दुरूस्तीसाठी होतो. पण प्रत्यक्ष उत्पन्न व खर्चामध्ये मोठी तफावत असल्याने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडून संचलन तुटीच्या नावाखाली ही रक्कम पीएमपीला दिली जाते. दरवर्षी ही तुट वाढतच चालली असल्याची स्थिती असून यंदा त्यामध्ये आणखी भर पडणार, असेच दिसते.नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी सुट्टीमुळे ‘पीएमपी’ला कमी उत्पन्न मिळाले. तसेच कर्मचाऱ्यांना बोनसही देण्यात आला. तसेच इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतन खर्चातील वाढ यामुळे खर्च वाढला आहे. बस ब्रेकडाऊनमुळे शेकडो फेºया रद्द होत आहेत. नवीन बस ताफ्यात वाढल्या असल्या तरी जुन्या बस मार्गावरून काढल्या जात आहेत. तसेच प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी आहे. याचा परिणाम आता ताळेबंदावर दिसू लागला आहे.

 
 

Web Title: only 10, 000 rupees Balance in PMP's bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.