आॅनलाइन फसवणूक; बँक खाते गोठविणार

By Admin | Updated: June 25, 2015 03:37 IST2015-06-25T03:37:26+5:302015-06-25T03:37:26+5:30

: ई-मेलद्वारे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक करणारी आंतरदेशीय टोळीचा ‘लोकमत’ने फर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी

Online fraud; Bank account frozen | आॅनलाइन फसवणूक; बँक खाते गोठविणार

आॅनलाइन फसवणूक; बँक खाते गोठविणार

पुणे : ई-मेलद्वारे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक करणारी आंतरदेशीय टोळीचा ‘लोकमत’ने फर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. या तपासात ‘लोकमत’च्या हाती लागलेले फसवणूक करणाऱ्यांचे स्टेट बँक आॅफ इंडियामधील (एसबीआय) खाते गोठविण्यात करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने दिली.
बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत फोन, एसएमएस करून फसवणुकीची अनेक प्रकरणे उजेडात येत असतानाच या फसवणुकीसाठी ई-मेलचाही वापर केला जात असल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. त्यावरून आॅनलाइन पद्धतीने हजारोंचा गंडा घालणाऱ्या टोळ्या देशात सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फसवणुकीसाठी आलेल्या ई-मेलव्दारे कशी फसवणूक केली जाते, याचा तपास ‘लोकमत’ प्रतिनिधीने घेतला. त्यासाठी फसवणूक करणाऱ्या कंपनींच्या व्यक्तीकडून मोबाईल क्रमांक आणि मागितलेले पैसे भरण्यासाठी
बँकेचा खाते क्रमांक मागितला होता. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने मणिपूर राज्यातील एसबीआय बँकेचा खाते क्रमांक दिला होता. ही माहिती ‘लोकमत’ने सायबर क्राईम विभागाला दिली. त्याचा तपास करताना एसबीआयमधील हे खाते फ्रीज करण्यात येणार असल्याचे सायबर क्राईम विभागाच्या
पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Online fraud; Bank account frozen