शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले डोळ्यांत पाणी! लागवडीचा खर्चही हाती पडेना, शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 00:35 IST

सतत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

दावडी : सतत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याला भाव नसल्याने शेतकरी शेतातील कांद्याची काढणी करण्याचे टाळत आहे. चाकण येथील मार्केटमध्ये केवळ पाच ते सहा रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही हाती पडत नसून शेतकरी हतबल झाले आहे.खेड तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कांद्याची लागवड केली आहे. काही शेतक-यांचे कांदे काढणीसाठी तयार झाले आहे. मात्र बाजार नसल्यामुळे पिकावर नांगर फिरवण्याची वेळ येणार आहे. गेल्यावर्षी कांद्याला चांगला भाव असल्यामुळे यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. एक एकर शेतीत कांदा लावण्यासाठी मशागतीपासून लागवड, खते, फवारणी, कापणी, गोणी भरणी, मजुरी, वाहतूक असा एकूण ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. सध्या भाव उतरल्याने उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असल्याचे चित्र दिसत आहे.भाव चांगला म्हणून लावला, पण फसलो!गतवर्षी कांदा कांदा उत्पादनातून चांगला फायदा झाल्याने यंदा एक एकरात कांद्याची लागवड केली. यासाठी मशागत, लागवड, खुरपणी, खते असा ८० हजार रुपये खर्च झाला. याशिवाय काढणी कापण्यासाठी आणखी २० हजार रुपयांच्या जवळपास खर्च येणार आहे.त्यामुळे पंधरा दिवसांत कांद्याचा भाव वाढला तरच कापणी करणार नाही तर कांदे तसेच शेतात सोडून देणार, अशी प्रतिक्रिया खेड तालुक्यातील मांजरेवाडी (पिंपळ) येथील शेतकरी मनोहर मांजरे यांनी व्यक्त केली.यंदा चांगला बाजारभाव मिळेल म्हणून कांदा लागवड केली. सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. परंतु, बाजारात कांद्याला चार ते पाच रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे उर्वरित कांदा काढून काहीच उपयोग होणार नाही बाजारभाव नसल्याने कांदा काढणी थांबवली असल्याचे रेटवडी (ता. खेड) येथील शेतकरी दिलीप पवळे यांनी सांगितले....कापणी काढणे न केलेलीच बरीखेड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. त्यामुळे काही शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. परंतु सध्या किरकोळ बाजारात पाच ते सहा रुपये किलोने विक्री होत आहे. चाकण बाजारपेठेमध्ये पाच ते सहा रुपये दर मिळत आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी झालेला खर्चही निघणार नसल्याने कांद्याची काढणी व काढणी करून काही उपयोग होत नसल्याचे दावडी येथील शेतकरी सुरेश डुंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदाagricultureशेती