रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:15 IST2025-01-01T11:15:21+5:302025-01-01T11:15:30+5:30

बालिका रडत असल्याने पार्सल विभागातील कर्मचाऱ्यांनी पालकांचा शोध घेतला. मात्र,

One-year-old girl found abandoned in railway station premises | रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत

रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत

पुणे :पुणेरेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षाची बालिका बेवारस अवस्थेत सापडली. बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून पसार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाच्या परिसरात बेवारस अवस्थेत बालिका आढळून आली. बालिका रडत असल्याने पार्सल विभागातील कर्मचाऱ्यांनी पालकांचा शोध घेतला. मात्र, पालक न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती बंडगार्डन पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बालिकेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.

बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक कंचन काळे तपास करत आहेत. सिंहगड रस्ता भागात महिनाभरापूर्वी नवजात अर्भक बेवारस अवस्थेत सोडून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Web Title: One-year-old girl found abandoned in railway station premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.