उकळते दुध अंगावर पडून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 21:30 IST2018-07-31T21:28:30+5:302018-07-31T21:30:37+5:30
उकळते दुध अंगावर पडल्याने एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे.

उकळते दुध अंगावर पडून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ठळक मुद्देससून रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी मृत्यु
पुणे : उकळते दुध अंगावर पडल्याने एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे.
भार्गवी अक्षय कुलकर्णी (वय १ वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. कुलकर्णी कुटुंबीय सिंहगड रोड परिसरात राहतात़ भार्गवी घरी असताना २६ जुलै रोजी तिच्या अंगावर उकळते दुध पडले होते़. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल केले होते़. उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी तिचा मृत्यु झाला़. कुलकर्णी कुटुंबिय उच्च शिक्षित असून अभिरुची पोलिसांनी याची नोंद घेतली आहे़. एक वर्षाच्या मुलीचा उकळते दुध अंगावर पडून मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़.