कबुतर चोरणाऱ्यांना विरोध करणाऱ्यालाच कोयत्याने वार करुन केले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 18:59 IST2021-06-13T18:58:48+5:302021-06-13T18:59:28+5:30
वानवडी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कबुतर चोरणाऱ्यांना विरोध करणाऱ्यालाच कोयत्याने वार करुन केले जखमी
पुणे: घरातील पाळलेली कबुतरांची चोरी करणाऱ्यांना विरोध केल्याने तिघांनी कोयत्याने वार करुन एकाला जबर जखमी करण्यात आले. वानवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद खान (वय ४४, रा. सैय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामपाल, साजिद नदाफ आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खान यांच्या घरासमोर ११ जून रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
खान यांनी घरात कबुतरे पाळली आहेत. पहाटेच्या सुमारास या कबुतरांची चोरी आरोपी करत होते. खान यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी चोरी करण्याला विराेध केला. त्यावेळी खान यांचा मुलगा हसनअल हा आला. आरोपींनी त्याला कटर फेकून मारला. खान हे त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो चुकवला. कोयता त्यांच्या हातावर लागून त्यात ते जखमी झाले. त्यानंतर आरोपी आरडाओरडा करत परिसरात दहशत माजवत पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक संदीप वरपडे अधिक तपास करीत आहेत