कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील एका संशयिताला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 19:14 IST2018-06-13T18:53:42+5:302018-06-13T19:14:05+5:30

गुन्हे अन्वेशष विभागाने गेल्या आठवड्यात राहुल फटांगडे याला मारणाऱ्याची छायाचित्रे व व्हिडिओ जारी केले होते. त्यातील एका संशयितास चतुश्रुंगी मंदिराजवळ बुधवारी दुपारी पकडण्यात आले आहे.

One suspect arrested in the Koregaon Bhima Violence Case | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील एका संशयिताला अटक 

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील एका संशयिताला अटक 

ठळक मुद्देचतुश्रुंगी मंदिराजवळ बुधवारी दुपारी पकडण्यात आले

पुणे :  कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारातील राहुल फटांगडे याच्या हत्येप्रकरणी चतुश्रुंगी पोलिसांनी सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातल्या टेंभुर्णीतून बुधवारी (दि. १३जून ) दुपारी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सुरज शिंदे (वय २१)  असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 
हा आरोपी पुण्यातील दौंड तालुक्यातील भीमनगरचा मूळ रहिवासी आहे. सध्या हा तरुण टेंभुर्णी परिसरात राहत होता. गुन्हे अन्वेशष विभागाने गेल्या आठवड्यात राहुल फटांगडे याला मारणाऱ्यांची छायाचित्रे व व्हिडिओ जारी केले होते. तेव्हापासून संशयित आरोपी आपले घर सोडून फरार झाला होता. चतुश्रुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांना त्याची माहिती मिळाली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीला अधिक तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात दिले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे. तसेच सीआयडीकडून त्याची चौकशी करण्यात येणार असून त्याचे फोटो व व्हिडिओशी पडताळणी करण्यात येत आहे. 

Web Title: One suspect arrested in the Koregaon Bhima Violence Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.