शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला

By admin | Updated: August 23, 2015 04:47 IST

कामावर निघालेल्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना फरासखाना पोलिसांनी गजाआड केले. या तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या

पुणे : कामावर निघालेल्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना फरासखाना पोलिसांनी गजाआड केले. या तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणानेच या आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संतोष मारुती जाधव (वय २८, रा. तोरणा अपार्टमेंट, बालाजीनगर), प्रभू आकाश पालकर (वय २३, रा. गोरक्षनाथ मठ, तळजाई मंदिरासमोर, पद्मावती), सोमनाथ दिनकर जाधव (वय २९, रा. मणेरवाडी, खानापूर), सनी ऊर्फ लक्ष्मीकांत मनोहर क्षीरसागर (वय २९, रा. राममंदिराजवळ, जनता वसाहत) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी धनकवडीमध्ये राहणाऱ्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करते. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही तरुणी दुचाकीवरून कामावर जात असताना राजेंद्रनगर येथील सचिन तेंडुलकर उद्यानासमोर तिच्यावर हल्ला झाला. दरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रमेश चौधर यांना आरोपींनी वापरलेल्या दुचाकीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार दुचाकी मालकाला गाठल्यावर आरोपींपर्यंत पोचण्यास मदत झाली. सनी ऊर्फ लक्ष्मीकांत याचे पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता.