शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एकाच्या तोंडाला तर एकाच्या गळाल्या कापले; बारामतीत चिनी मांजाने दोघांना केले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:15 IST

केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे

बारामती : बारामती शहर व परिसरात छुप्या पद्धतीने विकला गेलेला चिनी मांजा नागपंचमी दिवशी दोघांना गंभीर जखमी करून गेला. शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.    पहिल्या घटनेत वंजारवाडी (ता. बारामती) येथील माजी सैनिक अनिल मोहन कायगुडे (वय ४0)  ०९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी  हुतात्मा स्तंभ येथे जात असताना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास येथील मएसो विद्यालयासमोर चिनी मांजाने त्यांचा गळा कापला गेला. यात ते गंभीर जखमी झाले.नागरिकांनी त्यांना खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या गळ्याला मोठी जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. अचानक झालेल्या या घटनेमुळे ते दुचाकीवरून खाली कोसळले. कायगुडे हे बांधकाम व्यावसायिकही आहेत.या घटनेत मेजर अनिल कायगुडे यांचा जीव थोडक्यात बचावला. अन्यथा नागपंचमी दिवशीच त्यांच्या जीवावर बेतू शकले असते. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.    दुसरी घटना येथील तीन हत्ती चौकानजीक कालवा रस्त्यावर घडली. त्यात आदित्य उंडे नावाचा युवक गंभीर रित्या जखमी झाला. आदित्यला झालेली जखम ही तोंडापासून ते कानापर्यंत अशी आहे. त्याच्यावरही शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बारामतीतील विविध संघटनांनी चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा, अशी आग्रही मागणी नगरपरिषद व पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीनावर कारवाई करत त्याच्याकडून १२ हजारांचा चिनी मांजा जप्त केला. पण ही कारवाई पुरेशी नव्हती. छोट्या टपऱ्या व अन्य दुकानांची झडती घेत कारवाई झाली असती तर कदाचित या दोघांवर गंभीर जखमी व्हायची वेळ आली नसती, असे नागरिक सांगत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीHealthआरोग्यdoctorडॉक्टरNag PanchamiनागपंचमीAccidentअपघात