Gold Chain Snatched From Woman: पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 11:20 IST2022-02-03T11:20:05+5:302022-02-03T11:20:16+5:30
राजगुरुनगर शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाख १५ हजार रुपायांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून नेले

Gold Chain Snatched From Woman: पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावले
राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाख १५ हजार रुपायांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून नेले. ( दि. २) बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी खेडपोलिस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्याद देणाऱ्या मालती रामदास भगत (रा.अहिल्यादेवी चौक माळावर राजगुरुनगर) या व त्यांची मैत्रीण संगीता कदम राजगुरूनगर शहरातील वाडा रोडने शगुन कलेक्शन समोरून घरी जात होत्या. दरम्यान पाठीमागून टू व्हीलर मोटरसायकलवर दोन चोरट्यांनी येऊन त्यापैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्यांने भगत यांच्या गळ्यातील १ लाख १५ हजाराचे एक सोन्याची शॉर्ट गंठण जोरात हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेले. त्यानंतर भगत यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परिसरातील नागरिक मदतीसाठी आले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेचा पुढील तपास खेडपोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले करित आहे.