जारकरवाडी येथे ट्रॅक्टरचा अपघात, एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:36+5:302021-01-14T04:09:36+5:30

याबाबत सुभाष हनुमंत जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ऊस वाहतूक ट्रॅक्टरचालकांनी स्वतः बरोबर रस्त्यावरील नागरिकांची ...

One killed in tractor accident at Jarkarwadi | जारकरवाडी येथे ट्रॅक्टरचा अपघात, एक जण ठार

जारकरवाडी येथे ट्रॅक्टरचा अपघात, एक जण ठार

याबाबत सुभाष हनुमंत जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ऊस वाहतूक ट्रॅक्टरचालकांनी स्वतः बरोबर रस्त्यावरील नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: जारकरवाडी हद्दीत बडेकरमळा रस्त्याने जात असताना धामणी बाजूकडून पारगाव बाजूकडे जाणारा ट्रॅक्टर (एमएच 14 बीएच 14 74 )चालक ट्रॅक्टरला दोन उसाने भरलेल्या ट्रॉली जोडून चालवून घेऊन जात होता. ट्रॅक्टरला जोडलेल्या पाठीमागील ट्रॉलीची फिर्यादीच्या गाडीस ठोस लागून हनुमंत रघुनाथ बोऱ्हाडे (वय 55 रा. बोऱ्हाडेमळा, धामणी, ता.आंबेगाव )यांना किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या जखमा दुखापती झाल्या. बोऱ्हाडे यास तत्काळ मोटरसायकलवर बसवून उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच ते मयत असल्याचे घोषित केले. ट्रॅक्टर चालकाविरोधात मंचर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

Web Title: One killed in tractor accident at Jarkarwadi