शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Pune Crime: सहकारनगर भागात किरकोळ वादातून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा

By नितीश गोवंडे | Published: March 02, 2024 3:19 PM

शवविच्छेदन अहवालात कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले...

पुणे : किरकोळ वादातून एकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगरपोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तुकाराम निवृत्ती कांबळे (५७, रा. समता सोसायटी, सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कुशल शिंदे (रा. समता सोसायटी, सहकारनगर), लखन भिसे आणि शानू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांबळे यांची भावजय अनिता (५५) यांनी याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि आरोपी शिंदे, भिसे, शानू ओळखीचे आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. आरोपी कांबळे यांच्या घरात शिरले. ‘नाना तू माझा भाऊ विशाल याच्यावर खोटा आळ का घेतो. माझ्या भावाची बदनामी का करतो ?’, अशी विचारणा करून आरोपी शिंदे आणि साथीदारांनी कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेले कांंबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे करत आहेत.

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी