Pune: निमगाव खंडोबाजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत एकाचा मूत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 11:59 IST2024-01-29T11:58:39+5:302024-01-29T11:59:53+5:30

राजगुरूनगर ( पुणे ): निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने एकाचा जागीच मूत्यू झाला. ...

One killed in gas transporter Tempo collision near Nimgaon Khandoba | Pune: निमगाव खंडोबाजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत एकाचा मूत्यू

Pune: निमगाव खंडोबाजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत एकाचा मूत्यू

राजगुरूनगर (पुणे): निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने एकाचा जागीच मूत्यू झाला. प्रवीण उत्तम राठोड (वय ४५, सध्या रा. निमगाव, मूळगाव कृष्णनगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

निमगाव गावच्या हद्दीत दावडी निमगाव रोडवर येथे एका गॅसच्या टेम्पोने रस्ता क्रॉस करताना प्रवीण राठोड यांना जोरदार धडक दिली. या धडकेत राठोड यांचे तोंड, डोके व छातीस गंभीर जखम होऊन जागीच मृत्यू झाला. गॅस टेम्पोचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. खेड पोलिस तपास करत आहेत.

Web Title: One killed in gas transporter Tempo collision near Nimgaon Khandoba