शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

करडे येथील भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार , ७ जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 7:41 PM

कर्नाटक राज्यातील उदयगिरीनगर (ता. कोलार, जि. कोलार) येथील श्री. नरसिंह राजा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे आयोजन केले होते. युनिव्हा व इर्टिगा अशा दोन गाड्यांमध्ये १५ कर्मचारी प्रवास करत होते.

ठळक मुद्देकर्नाटकमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अपघातात सहभाग : एकाची प्रकृती गंभीर

शिरूर :  करडे गावाच्या हद्दीत बांदलमळानजीक भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर सात जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.६) दुपारी साडेबाराला घडला. कर्नाटक राज्यातील उदयगिरीनगर (ता. कोलार, जि. कोलार) येथील श्री. नरसिंह राजा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे आयोजन केले होते. युनिव्हा व इर्टिगा अशा दोन गाड्यांमध्ये १५ कर्मचारी प्रवास करत होते. कोलार, चित्रदुर्ग, हुबळी, बेळगाव, कोल्हापूर, फलटण, चौफुला या मार्गाने प्रवास करत वाहने शिर्डीकडे चालली होती. दरम्यान चौफुल्याकडून शिरूरकडे जात असताना करडे गावाच्या हद्दीत बांदल मळ्यानजीक मोटारसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात युनिव्हाचा (केए एए/३४६७) चालक किरण प्रसाद (रा. कोलार, कर्नाटक) याचा गाडीवरील ताबा सुटून गाडी झाडावर आदळली. या अपघातात गाडीत बसलेले डॉ. शिवकुमार एच. आर. हे जिल्हा सर्जन अधिकारी डोक्यास व पायास गंभीर दुखापत होऊन ठार झाले. चालक किरण प्रसाद हा गंभीर जखमी असून अन्य सात जण जखमी आहेत. स्थानिकांनी जखमींना शिरूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात स्टाफ नर्स विजयकला बाळाजी (वय ३१, रा. उदयगिरी, ता. कोलार, जि. कोलार, कर्नाटक) यांनी चालक किरण प्रसादच्या विरोधात हलगर्जीपणे वाहन चालवून व अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.  दरम्यान, अपघातग्रस्त अधिकारी व कर्मचारी सर्व कर्नाटक येथील असल्याने त्यांना मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान नसल्याने संवाद साधण्यास फार अडचणी येत होत्या. स्थानिकांनी जखमींना त्वरित खासगी रुग्णालयामध्ये हलविले. त्याचवेळी शिर्डी येथील आरोग्य सेवेच्या खासगी क्षेत्रात काम करणारे धीरज सुभाष टाक यांना फोन आल्याने ते तातडीने शिरूर येथे आले. त्यांना कन्नड, मराठी, हिंदी भाषा ज्ञात असल्याने पुढील, पोलीस स्टेशन, हॉस्पिटलमधील सोपस्कर पार पाडणे सोईचे झाले.

टॅग्स :ShirurशिरुरAccidentअपघातKarnatakकर्नाटकdoctorडॉक्टरDeathमृत्यू