इंदापुरात परवानाधारक पिस्टलमधून गोळी सुटल्याने एकजण जखमी; चौघांविरोधात गुन्हा दाखल
By किरण शिंदे | Updated: May 25, 2025 16:04 IST2025-05-25T16:02:55+5:302025-05-25T16:04:00+5:30
परवानाधारक पिस्टलची हलगर्जीने हाताळणी केल्यामुळे गोळी सुटून एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

इंदापुरात परवानाधारक पिस्टलमधून गोळी सुटल्याने एकजण जखमी; चौघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे - इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्महाऊसवर वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान परवानाधारक पिस्टलची हलगर्जीने हाताळणी केल्यामुळे गोळी सुटून एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (२४ मे) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
जखमीचे नाव सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख (रा. टेंभुर्णी, ता. माढा) असे असून, त्यांच्यावर सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेप्रकरणी प्रदिप जगदाळे, सुधीर महाडिक, विजय पवार आणि राजकुमार पाटील या चौघांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रमंडळी एकत्र आली असताना राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्टल सुधीर महाडिक देशमुख हाताळत असताना ती चुकून सुटली आणि गोळी थेट त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली. घटनास्थळी पोलिसांनी बंदुकीची रिकामी पुंगळी, एक हुक्का कप पाईप, पत्यांचा सेट आणि रक्ताचे नमुने जप्त केले आहेत.