बोलेरो-ट्रक अपघातात एकाचा जागीच मृत्यू, पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 10:44 IST2024-06-03T10:44:15+5:302024-06-03T10:44:32+5:30

वाल्हे (पुणे) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे नजीक पातर मळा येथे रविवारी (दि. २) सकाळी साडेसातच्या सुमारास जेजुरीच्या दिशेने ...

One died on the spot in a Bolero-Truck accident, an accident on the Pune-Pandharpur Palkhi highway | बोलेरो-ट्रक अपघातात एकाचा जागीच मृत्यू, पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघात

बोलेरो-ट्रक अपघातात एकाचा जागीच मृत्यू, पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघात

वाल्हे (पुणे) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे नजीक पातर मळा येथे रविवारी (दि. २) सकाळी साडेसातच्या सुमारास जेजुरीच्या दिशेने येणारी बोलेरो गाडी (एमएच १२ व्हीटी ८२६५) व निरेच्या दिशेने येणाऱ्या ट्रक (एमएच १२ क्यूडब्ल्यू ७८९९) याची धडक झाली.

या अपघातात बोलेरो गाडीचा चालक नवनाथ बाजीराव वाघमारे (वय ४२, रा. मांडकी, ता. पुरंदर) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. याबाबत दत्तात्रय महादेव वाघमारे (रा. मांडकी) यांनी वाल्हे येथील पोलिस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. तपास सहायक फौजदार रविराज कोकरे करीत आहेत.

Web Title: One died on the spot in a Bolero-Truck accident, an accident on the Pune-Pandharpur Palkhi highway