गुळाच्या ढेपांच्या खाली चेंगरून एकाचा मृत्यु; बघ्यांनी टेम्पो केला रिकामा, पुणे सोलापुर महामार्गावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 03:21 PM2023-07-27T15:21:38+5:302023-07-27T15:22:35+5:30

पिकअपमध्ये असलेल्या गुळांच्या ढेपेखाली दबल्याने वाहनचालकाचा जागीच मृत्यू

One died after being trapped under a pile of jaggery; Bystanders made the tempo empty | गुळाच्या ढेपांच्या खाली चेंगरून एकाचा मृत्यु; बघ्यांनी टेम्पो केला रिकामा, पुणे सोलापुर महामार्गावर अपघात

गुळाच्या ढेपांच्या खाली चेंगरून एकाचा मृत्यु; बघ्यांनी टेम्पो केला रिकामा, पुणे सोलापुर महामार्गावर अपघात

googlenewsNext

कुरकुंभ : कुरकुंभ येथे पुणे सोलापुर महामार्गावर गुरुवार(दि.२७)रोजी मध्यरात्री एक वाजता पिकअप वरील वाहनचालक राधेश्याम देवराम वानखेडे (वय २५) (रा. कमलापूर ता.पूर्णा, जि. परभणी) याचा वाहनवरील ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून अपघात झाला. पिकअपमध्ये असलेल्या गुळांच्या ढेपेखाली दबल्याने वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. सोबत असणारा इसम दूरवर फेकला गेल्याने किरकोळ जखमी झाला आहे.

लोणी काळभोर येथून गुळ भरून बार्शीकडे जाताना कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील इटीपीच्या वळण परिसरात हा अपघात झाला. वाहन वेगात धडकल्याने दोन तीन वेळा पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान सकाळी गुळांच्या ढेपेची गाडी पडल्याची बातमी कळताच अनेक नागरिकांनी याकडे धाव घेत मिळेल तेवढा गूळ पळवला. उशिरा येणाऱ्या काही नागरिकांच्या हाताला काहीच न लागल्याने त्यांची निराशा झाली मात्र काही जणांनी आटापिटा करून का होईना पण गुळ पळवण्यात धन्यता मानली. परिणामी संपूर्ण गाडी रिकामी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. गुळ पळवताना नागरिकांना महामार्गावरील सेवा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा देखील विसर पडला त्यामुळे जिवा पेक्षा गुळ महत्वाचा झाल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले.

Web Title: One died after being trapped under a pile of jaggery; Bystanders made the tempo empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.