शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

जलस्त्रोत वाचविण्यासाठी शहरातील नद्यांवर रविवारी एकदिवसीय उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 7:02 PM

शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.

ठळक मुद्देजागतिक नदीदिन; नव्या भूजल कायद्यावर हरकती नोंदवा सकाळी ९ ते ५ एकदिवसीय उपोषण करणारनागरिकांच्या सह्या घेतलेला अर्ज पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवणार

पुणे : शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोत संरक्षित करण्याबाबतच्या नव्या भूजल कायद्यावर आपल्या सूचना पाठवाव्यात आणि जलस्रोत संरक्षित करण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी जलदेवता सेवा अभियानाचे शैलेंद्र पटेल यांनी केली आहे. तसेच रविवारी नदीसंवर्धनासाठी उपोषण होणार आहे. या कायद्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजिली होती. यावेळी रवींद्र सिन्हा (भूजल अभियान), दीपक श्रोते (रामनदी स्वच्छता अभियान), ललित राठी (समग्र नदी परिवार) पुष्कर कुलकर्णी (वसुंधरा स्वच्छता अभियान) उपस्थित होते. या नव्या कायद्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. संस्था, नागरिक, तज्ज्ञांच्या सूचना मागवल्या आहेत. या सूचना उद्या म्हणजे ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत पाठवायच्या आहेत. पुण्यातून सुमारे २ हजारहून अधिक जणांनी सूचना केल्या आहेत. नागरिकांनी अधिकाधिक सूचना द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांनी  psec.wssd@ZÔhÔrÔshtrÔ.gov. यावर सूचना पाठवाव्यात.  --------------------------सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार आंतरराष्ट्रीय नदी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जलस्रोत वाचविण्यात यावे, असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. गंगा की अविरलतासाठी १०० दिवसांपासून उपोषण करणाऱ्या स्वामी सानंदजींना आपला सहभाग नोंदवण्यासाठी एकदिवसीय मुळा, मुठा, राम नदीवर उपोषण करण्यात येणार आहे. तसेच बावधन येथील रामनदीजवळील विठ्ठल मंदिर व कॉपोर्रेशन शाळेजवळ रविवारी (दि. ३०) सकाळी ९ ते ५ एकदिवसीय उपोषण करणार आहोत, असे पटेल म्हणाले.   नागरिकांच्या सह्या पंतप्रधानांना पाठविणार आपल्या पुढच्या पिढीसाठीची रामनदी प्रदूषणमुक्तव अविरल वाहत राहण्यासाठीचा सहभाग म्हणून सर्व नागरिकांच्या सह्या घेतलेला अर्ज पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवणार आहोत. तरी कृपया जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि सही करावी, असे आवाहन शैलेंद्र पटेल यांनी यावेळी केले.

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाriverनदी