शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर लायसन्स

By admin | Updated: October 17, 2015 00:58 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) लायसन्स आणि वाहननोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना आता केवळ एका क्लिकवर लायसन्स व आरसी बुकची माहिती मिळू शकणार आहे.

नीलेश जंगम, पिंपरीप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) लायसन्स आणि वाहननोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना आता केवळ एका क्लिकवर लायसन्स व आरसी बुकची माहिती मिळू शकणार आहे. परिवहन मंत्रालयातर्फे याबाबतचे दोन मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहेत. पुण्यातील आरटीओ कार्यालयात त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू आहे. तेथे ही कार्यप्रणाली यशस्वी झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्येही ती सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. लायसन्स, आरसी बुक न मिळाल्याच्या तक्रारी घेऊन असंख्य नागरिक आरटीओमध्ये हेलपाटे मारतात. रांगेमध्ये थांबा, या खिडकीवरून दुसऱ्या खिडकीवर जा असा, त्यांना नित्याचा अनुभव येत असतो. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी परिवहन कार्यालयाने हायटेक होत अ‍ॅप विकसित केले आहेत. या अ‍ॅपवर आपला क्रमांक टाकल्यानंतर सर्व माहिती लगेच उपलब्ध होणार आहे. लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लायसन्स क्रमांक मिळतो. त्यानंतर लायसन्स पोस्टाने घरी पाठविले जाते. ते ४५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा ते लवकर मिळू शकत नाही. ते का मिळाले नाही याची चौकशी करण्यासाठी आरटीओत जावे लागते. आता या अ‍ॅपवर लायसन्सचा क्रमांक टाकल्यानंतर, लायसन्स सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, त्याची डिलिव्हरी कधीपर्यंत मिळेल ते समजेल. याच पद्धतीने वाहननोंदणीच्या आरसी बुकचेही ट्रॅकिंग करता येईल.