अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक
By नम्रता फडणीस | Updated: January 3, 2024 16:52 IST2024-01-03T16:52:01+5:302024-01-03T16:52:25+5:30
मुलीच्या मनात आरोपीविषयी इतकी भीती बसली की तिने कॉलेजमध्ये प्रवेशच घेतला नाही

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे :महिलेबरोबर लिफ्ट मेण्टेनन्स वरून वाद झाल्याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला सातत्याने त्रास देऊन तिचा विनयभंग केल्या प्रकरणात एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. मुलीच्या मनात आरोपीविषयी इतकी भीती बसली की तिने कॉलेजमध्ये प्रवेशच घेतला नाही. पीडितेच्या आईने राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
१६ वर्षीय मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आई व आरोपी यांच्यात लिफ्टच्या मेंटेनन्स वरून जानेवारी २०२३ मध्ये वाद झाला होता. तेव्हापासून आरोपी हा फिर्यादीकडे पाहून अश्लील हातवारे करायचा. फिर्यादीला फोन नंबर मागायचा, जिन्यातून जात असताना आरोपीने फिर्यादीचा हात पकडला असता ती हिसका मारून पळून गेली. मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.