शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात सव्वा टीएमसी पाणीसाठा जमा, धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग

By नितीन चौधरी | Updated: June 19, 2025 20:48 IST

पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता.

पुणे : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे दिवसभरात सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे चारही धरणांची क्षमता ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, एकूण पाणीसाठा ८.६८ टीएमसी इतका झाला आहे.पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता. पावसाचा जोर वाढल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. यामुळे नदीकाठी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहरात गुरुवारी पहाटेपासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावत शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले. पावसाचा हा जोर खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होता. त्यामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी पहाटे सकाळी ६ वाजेपर्यंत चारही धरणांमध्ये एकत्रित पाणीसाठा ७.४० टीएमसी अर्थात २५.३९ टक्के इतका होता. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा पाणीसाठा ८.६८ टीएमसी अर्थात २९.७८ टक्के इतका झाला. दिवसभरात त्यामुळे सुमारे १.२८ टीएमसीची वाढ नोंदविण्यात आली. तर एकूण क्षमतेच्या हा साठा ३० टक्के झाला आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात खडकवासला धरणात ७३ मिलिमीटर, पानशेतमध्ये ११६, वरसगावमध्ये ११३ तर टेमघर धरण परिसरात ९० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. चारही धरणांमध्ये एकूण १ हजार २८० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू होती.परिणामी पावसाचा जोर लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने दुपारी १ वाजेपासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये १ हजार ९२० क्युसेकने विसर्गास सुरुवात आली. यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळी ६ वाजता हा विसर्ग ४ हजार ३४५ क्युसेक इतका करण्यात आला. तर तासाभरानंतर अर्थात सात वाजता विसर्ग साडेचार हजार क्युसेकने वाढवून एकूण ८ हजार ७३४ क्युसेक इतका करण्यात आला. पाणलोट क्षेत्रात रात्री पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढविला जाऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राशेजारील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा विभागाने दिला आहे.पुणे शहरात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दोन दिवस मुक्कामी आहेत .त्या पालख्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी नवीन मुठा कालव्यातून 50 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती खडकवासला पाट्बंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कु-हाडे यांनी दिली. दरम्यान  बंडगार्डन  बंधा-यातून 36 हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा झालेला पाणीसाठा

धरण--पाऊस (मिमी)--टीएमसी--क्षमता (टक्के)

खडकवासला ७३-१.६६--८३.९५

पानशेत ११६--२.४६--२३.१३ वरसगाव ११३--४.१६--३२.४५

टेमघर ९०--०.४०--१०.८४

एकूण ८.६८ टीएमसी २९.७८ टक्के

गेल्या वर्षाची स्थिती

एकूण ३.६२ टीएमसी--१२.४३ टक्के

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater shortageपाणीकपातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र