शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:28 IST

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरात पडली फूट ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश

इंदापूर :  राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी ( दि.१६ जुलै ) प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,  इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, दत्तात्रय घोगरे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,  इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी इजगुडे, युवा उद्योजक रणजित घोगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील, कुलदीप पाटील यांनी प्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्कात माजी सभापती प्रशांत पाटील अनेक वेळा आले होते. १९९६ मध्ये पाटील यांनी बावड्याचे पाटील घराणे एकत्र करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती. अत्यंत अभ्यासू व आक्रमक म्हणून त्यांची इंदापूर तालुक्यात ओळख आहे.  

असा होणार परिणाम...  

प्रशांत पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राहत्या बावडा गावात व बावडा - लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात, तसेच इंदापूर तालुक्यात राजकीय प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पहिल्यांदाच बावडा येथील प्रसिद्ध असणाऱ्या पाटील घराण्यात जनाधार प्राप्त झाला आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना तसेच इतर संस्थांमध्येेेे व पंचायत समितीमध्ये पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनेेे काम केले आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूर तालुक्यात होणार आहे. 

ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं...! इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील प्रवेश केल्यानंतर म्हणाले, इंदापूर तालुक्याची जडण-घडण काँग्रेस विचारातून झाल्यामुळे आमची भाजपमध्ये प्रचंड घुसमट होत होती. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस बलवान बनवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.  माझा प्रवेश म्हणजे, ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं.. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळणार.. पाटील यांना सामाजिक राजकीय कामाचा अत्यंत सखोल अनुभव असल्यामुळे व बावडा परिसरात अनेक कुटुंबांची ऋणानुबंध पाटील यांचे असल्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन दमदार होण्यासाठी मदत होईल अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

टॅग्स :IndapurइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण