कोथरूड परिसरातील फ्लॅटवर भरदिवसा डल्ला, सात तोळे सोने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 20:01 IST2024-03-20T20:00:49+5:302024-03-20T20:01:15+5:30
याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे....

कोथरूड परिसरातील फ्लॅटवर भरदिवसा डल्ला, सात तोळे सोने लंपास
पुणे :कोथरूड शास्त्रीनगर येथील विवेकानंद कॉलनीतील एका सदनिकेवर चोरट्यांनी डल्ला मारला. साडेतीन लाख रुपये किमतीचे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १५ ते १७ मार्च या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने कोथरूडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
विवेकानंद कॉलनी, शास्त्रीनगर येथील भास्कर बिल्डिंगमध्ये फिर्यादी यांची सदनिका आहे. दरम्यानच्या काळात त्यांची सदनिका बंद असताना, चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचा ऐवज चोरी करून पळ काढला. पोलिस उपनिरीक्षक माळी पुढील तपास करत आहेत.
बंद सदनिकेत चोरी
सिद्धी रेसिडेन्सी पेरणे फाटा येथील दीपक वाकचौरे (वय २६) यांच्या बंद सदनिकेत चोरट्यांनी चोरी करून सोन्याचे दागिने, मोबाइल असा ४७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लोणीकंद पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. १९ मार्च रोजी भरदिवसा ही चाेरीची घटना झाली.