पीएमपी व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरीया; आता पुण्याची पीएमपी वेग घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 20:00 IST2022-10-14T20:00:01+5:302022-10-14T20:00:22+5:30
ओमप्रकाश बकोरीया हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात.

पीएमपी व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरीया; आता पुण्याची पीएमपी वेग घेणार
पुणे : पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरीया यांची शुक्रवारी (दि.१४) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी सायंकाळी उशीरा काढण्यात आले. लक्ष्मीनारायण मिश्रा यांची काही महिन्यांपूर्वीच पीएमपीच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ओमप्रकाश बकोरीयांची नियुक्ती झाली आहे.
बकोरीया हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे भविष्यात पीएमपी चांगला वेग घेईल, अशी चर्चा होत आहे. यापूर्वी पुणे महापालिकेत उपायुक्तपदी काम केले आहे. लक्ष्मीनारायण मिश्रा यांची केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वीय सहायकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून मिश्रा दिल्ली येथे गेले होते. त्यामुळे संचालकपदाची जागा रिक्त होती.