अरे, तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 06:52 IST2021-11-15T06:52:11+5:302021-11-15T06:52:39+5:30

अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले

Oh, you are an MLA, you use a mask though! Says Ajit pawar | अरे, तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर!

अरे, तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर!

बारामती : मी काल कर्जत - जामखेडला गेलो होतो. तिकडे कोणीही मास्क वापरत नाहीत. मी रोहितला म्हटले, ‘अरे, शहाण्या तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर, मला इतरांना सांगता येईल’,  अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवारांचे कान धरले. 

धुमाळवाडी (ता. बारामती) येथील एका पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार म्हणाले, मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् काही जण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही. कोरोना कमी झाला असला तरी दक्षता घेण्याची गरज आहे. सकाळी लवकर कामाला सुरुवात केली तर, कामे लवकर होतात. काही जण दादा सेल्फी, दादा फोटो म्हणत मागे लागतात. त्यांना नाही म्हणावे तर, उपमुख्यमंत्री झाला, साधा सेल्फी काढून देईना. याची बटने दाबून दाबून आम्ही मेलो इतके दिवस, असे म्हणत असतील. म्हणून आपले गप्प बसायचे अन् पहाटे जेवढे काही उरकता येईल तेवढे उरकून घ्यायचा प्रयत्न करायचा, अशा शैलीत त्यांनी चिमटा काढला.

तुटेपर्यंत ताणायचे नसते
कुठेही तुटेपर्यंत ताणायचे नसते. 
ते सुद्धा समाधानी झाले पाहिजेत. प्रवासी सुद्धा समाधानी झाले पाहिजेत, सरकार म्हणून आम्हालाही निर्णय घेता आला पाहिजे, असे पवार म्हणाले.

Web Title: Oh, you are an MLA, you use a mask though! Says Ajit pawar