अरे बापरे! महिलेला वडापाव पडला '८ लाखांना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 20:17 IST2021-08-26T20:17:50+5:302021-08-26T20:17:57+5:30

घरी जाण्याच्या वाटेत एका चौकात थांबली होती कार

Oh my god Woman gets Rs 8 lakh | अरे बापरे! महिलेला वडापाव पडला '८ लाखांना'

अरे बापरे! महिलेला वडापाव पडला '८ लाखांना'

ठळक मुद्देचोरट्याने कारमधील पर्स नेली चोरुन

पुणे : घरी जात असताना वाटेत वडापाव घेण्यासाठी थांबलेल्या महिलेला पर्स चोरीला गेल्याने तब्बल ८ लाख रुपये गमवावे लागले आहेत.  ही घटना सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकात बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजता घडली. याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या कारने घरी जात होत्या. त्यांच्याबरोबर त्यांची वहिनी होती.

यावेळी अहिल्यादेवी चौकात संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अमृततल्यजवळ कार थांबवली. त्यांची वहिनी कारमधून उतरुन दुकानात वडा पाव घेण्यासाठी गेल्या. फिर्यादी महिला या कारमध्येच बसून होत्या. तितक्यात एकाने त्यांना खाली पैसे पडल्याचे सांगितले.

पण, सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुन्हा आणखी दोघांनी तसेच सांगितल्यावर त्यांनी गाडीतूनच त्याकडे पाहिल्याने त्याच काही क्षणात चोरट्याने डाव्या सीटवर असलेल्या त्यांची पर्स चोरुन नेली. पर्समध्ये ८ तोळे वजनाचे दागिने व १० हजार रुपये राेख असा ८ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज होता. त्यांची वहिनी वडापाव घेऊन गाडी येऊन बसल्यावर त्या घरी गेल्या.

घरी गेल्यावर आपली पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा येऊन शोधाशोध केली. सहकारनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. अंगावर घाण पडली, पैसे पडले असा बहाणा करुन चोरी करणाऱ्या टोळीपैकी काही जण त्यांच्या कारच्या आजूबाजूला फिरत असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Oh my god Woman gets Rs 8 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.