अरे देवा! एसटीची मागची २ चाके अचानक निखळली, 35 प्रवासी सुखरुप बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 16:49 IST2023-05-16T16:48:45+5:302023-05-16T16:49:28+5:30
चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले

अरे देवा! एसटीची मागची २ चाके अचानक निखळली, 35 प्रवासी सुखरुप बचावले
मंचर: एस टी बसची मागची दोन्ही चाके निखळल्याची घटना मंचर जवळील शेवाळवाडी येथे घडली. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरुप बचावले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परेल एस टी आगाराची परेल नारायणगाव एस टी बस (क्रमाक एम एच बी एल ३६१८) पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या मंचर जवळील शेवाळवाडी परिसरात लालपरीची ड्रायव्हर साईटच्या मागील असलेल्या एका बाजूची दोन्ही चाके अचानक निखळली. मात्र चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. राजगुरुनगर एस टी आगाराच्या दुरस्ती पथकाने येऊन एस टी बस दुरुस्त केल्याची माहिती मंचर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक एम .डी .शिंदे यांनी दिली .