शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

प्रेमात अडथळा; व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून खून, सीसीटीव्हीमुळे गुन्हा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 12:32 PM

गाडी रिव्हर्स घेत असल्याचा बनाव करीत त्या व्यक्तीच्या अंगावर घातली असल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले

नारायणगाव : प्रेमात अडसर आणि प्रेयसीला त्रास देणाऱ्या ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्याचा खून केल्याप्रकरणी जुन्नर येथील प्रियकर व प्रेयसीला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची (दि. १६) पोलिस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक सानील धनवे यांनी दिली.

प्रियकर अभिजित जालिंदर सोनवणे (वय २४, रा. डिंगोरे, ता. जुन्नर) व प्रेयसी जेबा इरफान इनामदार (वय ३२, रा. कसाब आळी, जुन्नर) यांच्यावर भादंवि ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत साबीर शफिक बेपारी कुरेशी (वय ४५ रा . मनसुबा पेठ, कसाबाई, जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद माजिद बेपारी यांनी दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार विवाहित असलेला साबीर बेपारी कुरेशी याने ६ महिन्यांपूर्वी जेबा हिला प्रपोज केले होते, मात्र जेबा हिने साबीरला नकार दिला होता. यानंतर अभिजित सोनवणे व जेबा इनामदार यांच्यामध्ये काही महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरू होते. ११ एप्रिलला रमजाननिमित्त अभिजित हा जुन्नर येथे जेबा हिच्या घरी आला होता. तेव्हा साबीर व अभिजितमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. १२ एप्रिलला साबीर हा नारायणगाव येथे पुणे-नाशिक महार्गावर हॉटेल अयोध्याजवळ उभा असल्याची माहिती अभिजित सोनवणेला जेबाने मोबाइलवरून दिली होती. अभिजित सोनावणे याने जेबा इनामदार हिच्या सोबत संगनमत करून प्रेमात अडसर ठरणाऱ्या साबीर शफिक बेपारी याचा काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवार (दि. १२) नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या अयोध्या हॉटेलसमोर अभिजित सोनावणे यांच्या मालकीची कार ही साबीर बेपारी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारले. हा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला आहे. गाडी रिव्हर्स घेत असल्याचा बनाव करीत साबीर यांच्या अंगावर घातली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलिस हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीcarकारDeathमृत्यू