मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:37 IST2025-07-02T19:36:54+5:302025-07-02T19:37:06+5:30

आई आणि मुलगी रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाने मुलीसोबत अश्लील चाळे केले

Obscene act with daughter When mother questioned, rickshaw driver threatened her | मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी

मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी

पुणे: रिक्षाने आईसोबत प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीशी एकाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रिक्षा प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

तक्रारदार महिला ही मंगळवारी (दि. १) दुपारी मुलीसोबत रिक्षातून पुणे-सोलापूर रस्त्याने निघाली होती. त्यावेळी रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या एकाने महिलेच्या मुुलीसोबत अश्लील कृत्य केले. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. तिने रिक्षातील प्रवाशाला जाब विचारला, तेव्हा रिक्षातील प्रवाशाने महिलेला शिवीगाळ केली. तिला धमकी देऊन ताे पसार झाला. याबाबत महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रिक्षा प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बोबडे पुढील तपास करीत आहेत.

पीएमपी प्रवासादरम्यान महिलेकडील सोन्याची बांगडी लंपास

 पीएमपी प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेकडील पावणेदोन लाखांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबवल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरोधात वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील तक्रारदार ६५ वर्षीय महिला कोथरूड भागात राहायला आहे. त्या पीएमपी बसने मंगळवारी (दि. १) प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी गर्दीत कटरचा वापर करून त्यांच्या हातातील पावणेदोन लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली. पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोपे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Obscene act with daughter When mother questioned, rickshaw driver threatened her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.