Pune: पुण्यातील 2BHK हॉटेलच्या पार्किंगमध्ये 19 वर्षीय तरुणीसोबत अश्लील कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 21:10 IST2022-03-29T21:10:20+5:302022-03-29T21:10:34+5:30
पुण्यातील राजा बहादुर मिल परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध 2BHK हॉटेलच्या पार्किंगमध्ये 19 वर्षीय तरुणीसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Pune: पुण्यातील 2BHK हॉटेलच्या पार्किंगमध्ये 19 वर्षीय तरुणीसोबत अश्लील कृत्य
पुणे : पुण्यातील राजा बहादुर मिल परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध 2BHK हॉटेलच्या पार्किंगमध्ये 19 वर्षीय तरुणीसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 13 मार्च रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारी नंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओहनसिंग साहनी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फिर्यादी या मित्रासोबत जेवण करून पार्किंगमध्ये थांबल्या होत्या. त्यावेळी त्याच परिसरात आठ ते दहा जण भांडण करत होते. यातील एक जण फिर्यादीच्या दिशेने आला आणि त्याने तिचा हात धरून ओढला. तिच्या सोबत अश्लील कृत्य करत विनयभंग केला. दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादीच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान या प्रकारानंतर पीडित मुलीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोरड करत आहेत.
या परिसरातील हॉटेलमध्ये अशा प्रकारचे कृत्य वारंवार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राजा बहादुर मिल परिसरात मोठे हॉटेल असून रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल सुरू असतात. या ठिकाणी पब असल्याने रात्री उशिरापर्यंत तरुणाईचा वावर या परिसरात असतो. विशेष म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या गैरकृत्याकडे पोलीसही दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.