शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

ओबीसी, खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीचा निर्णय त्वरीत घ्यावा : मराठा क्रांती मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 7:46 PM

पुन्हा आंदोलन उभारण्याचा दिला इशारा

ठळक मुद्देमराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना आवाहन

पुणे : पदोन्नतीमधे दिलेल्या ३३ टक्के आरक्षणाला उच्च न्य्यालयाने स्थगिती दिली असताना राज्य सरकार पुन्हा आरक्षण देऊ करीत आहे. त्या उलट ओबीसी, मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना १६ ते २० वर्षे पदोन्नती मिळत नाही. शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (इएसबीसी) रखडलेल्या नियुक्त्या, समांतर आरक्षण आणि सारथी संस्थेचे प्रलंबित प्रश्न मार्गी न लावल्यास मराठा क्रांती मोर्चाला पुन्हा आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा राजेंद्र कोंढरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.शांताराम कुंजीरस राजेंद्र कुंजीर, गणेश मापारी, बाळासाहेब अमराळे, हनुमंतराव मोटे, रघुनाथ चित्रे पाटील या वेळी उपस्थित होते. मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारने वर्ग एक व त्यावरील पदांवर पदोन्नतीसाठी ३३ टक्के आरक्षण देऊ केले आहे. त्यात १३ टक्के अनुसुचित जाती (एससी), ७ टक्के अनुसुचित जमाती (एसटी) आणि १३ टक्के इतर आरक्षण देऊ केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णया विरोधात आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील गेल्या तीन वर्षांपासून त्यास स्थगिती दिली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे राज्य सरकारला बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकार विरुद्ध भारतीय समानता मंचाच्या अंतरीम आदेशाचा वापर करुन पदोन्नतीचे स्थगित ठेवलेले आरक्षण लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे खुल्या व इतर मागास वर्गातील घटकांवर अन्याय होणार आहे. ओबीसी, मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कर्मचाºयांना १६ ते वीस वर्षे पदोन्नती मिळत नाही. राज्य सरकारने बेकायदेशीर पदोन्नती देण्या ऐवजी सर्वोच्च न्यायालयाला प्रलंबित केस निकाली काढण्यास विनंती केली पाहिजे. राज्य सरकारने २१ डिसेंबर २०१९ रोजी जात प्रमाणपत्र पडताळणीत वैध नसलेल्या ५ ते १५ हजार कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करुन सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून कमी करायला हवे, असे कोंढरे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षणState Governmentराज्य सरकार