Pune | पुण्यात डॉक्टरकडून परिचारिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:33 IST2023-01-28T12:31:39+5:302023-01-28T12:33:53+5:30
डॉक्टरच्या त्रासाला कंटाळून तरुणीची पोलिसांत तक्रार....

Pune | पुण्यात डॉक्टरकडून परिचारिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल
पुणे : परिचारिकेला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डाॅक्टरविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. प्रसाद जोगदंड असे विनयभंग करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे.
याबाबत परिचारिकेने हडपसर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, काही वर्षांपूर्वी परिचारिका डाॅ. जोगदंड यांच्या रुग्णालयात कामाला होती. परिचारिकेने त्यांच्या रुग्णालयातील नोकरी सोडली होती. त्यानंतर डाॅ. जोगदंड यांनी परिचारिकेला संदेश पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या मोबाइलवर अश्लील संदेश पाठवले.
या नेहमीच्या त्रासामुळे महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक भैरव शेळके पुढील तपास करत आहेत.