शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागातील टँकरची संख्या चारशेवर : दुष्काळाची तीव्रता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:35 IST

पुणे विभागातील ८ लाख १५ हजार नागरिक आणि  ४४ हजार ९९८ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहे.

ठळक मुद्देविभागातील दुष्काळाने बाधित झालेल्या गावांची संख्या ३६२ वर सातारा , सांगली व सोलापूर जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा

पुणे : पुणे विभागातील ८ लाख १५ हजार नागरिक आणि  ४४ हजार ९९८ पशुधन दुष्काळाने बाधित प्रभावित झाले आहे. सातारा ,सांगली व सोलापूर जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ११७ टँकर सुरू आहेत. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पुणे विभागातील दुष्काळ बाधितांना ४०६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. विभागातील दुष्काळाने बाधित झालेल्या गावांची संख्या ३६२ वर गेली आहे. वाड्यांची संख्या २ हजार ६०० झाली आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या ८० आहे. तर साताºयात १०१ टँकर सुरू आहेत. यंदा दुष्काळाची तीव्रता भीषण असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील टँकरची संख्या चांगलीच वाढणार आहे. सध्या सोलापुरातील एकट्या मंगळवेढा तालुक्यात ४१ आणि सांगोला तालुक्यात २० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर विभागात सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यात सर्वाधिक ६८ टँकरने सुरू आहेत. जतमधील १ लाख ६३ हजार ७२९ नागरिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात ८० टँकर सुरू असून बारामतीत २२ तर शिरूरमध्ये १७ टँकर सुरू आहेत. तर सांगलीत १०८ टँकरने पाणी पुरवठा सुरू असून माण तालुक्यत ६४ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४५ हजार ८२१ नागरिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. सोलापूर पाठोपाठ सांगलीमधील २ लाख ४३ हजार ३४४  नागरिक प्रभावित झाले आहेत. तर साताऱ्यातील बाधितांची संख्या १ लाख ७२ हजार ३३७ झाली असून पुणे जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ३१५ नागरिक दुष्काळाने बाधित आहेत. - जिल्हा व तालुका निहाय टँकर व बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे:    पुणे : आंबेगाव १२, बारामती २२, दौंड ९, हवेली २, इंदापूर २,जुन्नर ३, खेड ४, पुरंदर ९, शिरूर १७.  सातारा : माण ६४, खटाव १४, कोरेगाव १७, फलटण ३, खंडळा १, वाई १.   सांगली : जत ६८, कवठेमहांकाळ ८, तासगाव ३, खानापूर ८, आटपाडी २१.   सोलापूर : सांगोला २१, मंगळवेढा ४१, माढा ७, करमाळा १७, माळशिरस ७, मोहोळ ४, दक्षिण सोलापूर १०, उत्तर सोलापूर ४, अक्कलकोट ३, बार्शी ३.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळWaterपाणीSolapurसोलापूरSangliसांगली