शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या १७०० ; शहरात दिवसभरात ८६ नव्या रग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 00:23 IST

पुणे शहरात दिवसभरात ४४ रुग्ण बरे होऊन गेले घरी

ठळक मुद्देपुणे शहरात एकूण ६० रुग्ण अत्यवस्थ तर पाच रुग्णांचा मृत्यू       बारामती तालुका राबविण्यात आलेल्या अत्यंत कडक उपाययोजनामुळे कोरोनामुक्त

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. एका दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये १०५ भर पडली. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बारामती तालुक्यात राबविण्यात आलेल्या अत्यंत कडक उपाययोजनामुळे हा तालुका कोरोना मुक्त झाला आहे. परंतु पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून, ही वाढती संख्या प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळेच पुढील तीन दिवस शहरातील कोरोना प्रभावित क्षेत्रात अत्यंत कडक निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आले. पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता १७०० वर जाऊन पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण ९२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. दरम्यान बरे होऊन घरी गेलेले कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ३०९ झाले आहेत.

पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड हजारांवर पोचला असून गुरुवारी दिवसभरात ८६ रूग्णांची भर पडली. शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १ हजार ५१८ पर्यंत पोचली आहे. दिवसभरात एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ६० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  कोरोनाचा शहरातील संसर्ग वाढत चालला आहे. शहरातील रुग्णांचा आकडा गेल्या आठवड्यात साडे पाचशे रूग्णांची भर पडली आहे. रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. गुरुवारी रात्री साडे आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०४, नायडू रुग्णालयात ७४ तर खासगी रुग्णालयांमध्ये ०८ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शहरात गुरुवारी पाच मृतांची नोंद करण्यात आली. यातील दोन जण पुण्यातील आहेत. तर, खडकी, इंदापूर आणि कोल्हापूरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८८ झाली आहे. एकूण ४४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २७४ झाली आहे.------पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती पुणे जिल्हा एकूण रूग्ण : १७००एकूण मृत्यु झालेले रूग्ण : ९२बरे होऊन घरी गेलेले रूग्ण : ३०९____ पुणे शहर : १५०५पिंपरी चिंचवड : ११३ पुणे ग्रामीण : ८२

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू