Pune Corona News : सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा ३ हजारांच्या पुढे; गुरूवारी शहरात ३३३ कोरोनाबाधितांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 19:51 IST2021-07-22T19:46:46+5:302021-07-22T19:51:25+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ७९१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.२७ टक्के इतकी आढळून आली आहे.

Pune Corona News : सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा ३ हजारांच्या पुढे; गुरूवारी शहरात ३३३ कोरोनाबाधितांची वाढ
पुणे : शहरात गुरूवारी ३३३ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ७९१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.२७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आज पुन्हा ३ हजाराच्या पुढे गेली असून, आजमितीला शहरात ३ हजार ७ इतकी आहे. आज दिवसभरात १०जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३७२ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २८ लाख १६ हजार ६७५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८५ हजार ३५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७३ हजार ३१३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७१५ जणांचा मृत्यू झाला आहे.