आता ‘बालगंधर्व’ मध्ये राहण्याची सोय राहिली नाही...! अशोक सराफांची मिश्किल टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 20:10 IST2023-01-08T20:09:59+5:302023-01-08T20:10:26+5:30

आजकाल मात्र कथानकावर कमी आणि तांत्रिक बाजूवर अधिक भर दिला जातो

Now there is no accommodation in 'Balgandharva'...! Ashok Sarafa's difficult remarks | आता ‘बालगंधर्व’ मध्ये राहण्याची सोय राहिली नाही...! अशोक सराफांची मिश्किल टिपण्णी

आता ‘बालगंधर्व’ मध्ये राहण्याची सोय राहिली नाही...! अशोक सराफांची मिश्किल टिपण्णी

पुणे : पूर्वी माझे डार्लिंग डार्लिंग हे नाटक बालगंधर्व रंगमंदिरात तब्बल दीड महिना हाऊसफूल चालले होते. तेव्हा मी तिथेच मुक्काम ठोकून होतो. पण आता बालगंधर्वमध्ये राहण्याची तशी सोय आहे, पण तिथे राहावे तशी सोय राहिलेली नाही, अशी मिश्किल टिपण्णी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी बालगंधर्व रंगमंदिरातील सोयीबाबत केली आहे. 

अभिव्यक्ती व रावेतकर यांच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त तीन दिवसीय अशोक पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रविवारी अभिनेते प्रशांत दामले यांनी अशोक सराफ यांची मुलाखत घेतली. त्या वेळी सराफ बोलत होते. दोघांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. दामले सुरवातीला म्हणाले, ‘अशोक सराफ यांना बोलतं करणं अत्यंत अवघड आहे. त्यापेक्षा मी दोन प्रयोग अधिक करीन, यावर उपस्थित रसिकांनी मनमुराद दाद दिली.

पूर्वी आणि आताच्या चित्रपट निर्मितीमध्ये बदल काय झाले ? यावर सराफ म्हणाले, आता फक्त तांत्रिक बाबींवर खूप लक्ष दिले जाते. लोकांना जी गोष्ट सांगायची आहे, ती नेमकी हवी. त्यावर लोकं चर्चा करतात. ते त्यांना आवडते. आजकाल मात्र कथानकावर कमी आणि तांत्रिक बाजूवर अधिक भर दिला जातो.’’

एक डाव भुताचा यामधील सर्व आवाज मी स्वत: काढले आहेत. त्यात वादळाचा आवाज, दरवाजा करकर करतो, असे सर्व आवाज मी केले आहेत. त्यानंतर ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ हे गाणंही मी स्वत: गायले आहे. ते खूप प्रसिध्द झाले, असे सराफ यांनी आठवणी सांगितली.

बायकोमुळे शिस्त

निवेदिता सराफ आयुष्यात आल्यामुळे एक शिस्त लागली. ती आहे म्हणून मी शिस्तबध्द असतो. लग्नाअगोदरही शिस्त पाळायचो. परंतु, निवेदिता घरात आल्यानंतर मला स्थैर्य मिळाले, असे कौतूक अशोक सराफ यांनी आपल्या पत्नीचे केले.

माझ्या आयुष्यातील एक चूक....

सराफ म्हणाले, गेला माधव कुणीकडे हे नाटक स्वीकारले नाही. ती माझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक होती. कारण त्यानंतर ते नाटक खूप गाजले. परंतु, दुसरीकडे माझ्या या चुकीमुळे मराठी लोकांना एक चांगला नट देखील मिळाला आहे.

Web Title: Now there is no accommodation in 'Balgandharva'...! Ashok Sarafa's difficult remarks